PUNE CRIME : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 7 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस जप्त; दोघांना अटक - टॉप न्यूज मराठी

pune crime : पुणे शहर गुन्हे शाखेच्या बाणेर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 7 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी झाली. पोलीस अंमलदार अतुल इंगळे यांना बालेवाडी परिसरात एक इसम पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशावरून सर्च पथक तेथे गेले असता ओंकार बाबासाहेब जाधव (वय 20, रा. सुसरोड) हा संशयास्पद मिळाला. झडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे सापडली.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा मित्र सुनील विके याने अशीच अनेक पिस्तुले आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी बालेवाडीतील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर छापा टाकला. तेथे मुनीष रामाडे नावाचा साथीदार मिळाला आणि त्याच्याकडून आणखी 6 गावठी पिस्तूल आणि 2 काडतुसे जप्त केली.

या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.