PUNE CRIME : 2 वर्षांपासून फरार असलेला घरफोडीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, 2 गुन्हे उघड - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत घरफोडीच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून खडकी आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस आयुक्तांचे आदेश आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 ने ही कारवाई केली. पोलीस अंमलदार संदीप लोखंडे यांना खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शिंदे हा धायरी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

माहितीच्या आधारे पथकाने 16 ऑगस्ट 2026 रोजी धायरीतील माळी मळा येथील एका माळीमध्ये छापा टाकला. यावेळी आकाश उर्फ बाळ्या नरहरी शिंदे वय 28 राहणार रजनी विहार सोसायटी शेजारी जांभवनगर राकरमळा धायरी याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खडकी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 96/2024 भादवि कलम 329, 38 प्रमाणे दाखल घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चतु:शृंगी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 61/2020 भादवि कलम 380, 454 प्रमाणे दाखल घरफोडीचा गुन्हाही त्यानेच केला असल्याचे सांगितले.

आरोपीने दोन्ही गुन्हे कबूल केल्याने दोन वर्षांपासून प्रलंबित असले हे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 च्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.