PUNE CRIME : पुण्यात गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक ! दोन मोहिमेत 100 हून अधिक आरोपी गजाआड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : आगामी निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नांदेड परिमंडळाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 31/01/2025 आणि 26/02/2025 रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी अवैध धंदे, हत्यार बाळगणारे आणि फरार आरोपींवर धडक कारवाई केली आहे.

पहिल्या मोहिमेत दिनांक 31 जानेवारी रोजी पोलिसांनी एकूण 34 गुन्हे दाखल करत 91 आरोपींना अटक केली. यामध्ये 3 पिस्टल, 4 काडतुसे, 29 हजारांचा मुद्देमाल, अंगावर कोयता बाळगून दहशत पसरवणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 74 हजार, 96 हजार, 861 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 3 हजार 500 रुपये, 29 हजार 884 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण 42 लाख 40 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 1 लाख 31 हजार रुपयांचा अवैध दारू साठाही जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या मोहिमेत 26 फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिता कलम 304 अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये 20 आरोपींना अटक करून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 40 आरोपींवर कारवाई केली आहे. 45 हजार 400 रुपयांचा, 15 हजार 400 रुपयांचा आणि 3 लाख 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 42 आरोपींवर कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये हडपसर, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, सहकारनगर, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकांनी सहभाग घेतला होता.