PUNE CRIME : पुण्यात दहशत माजवणाऱ्या सराईताला पर्वती पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 1 देशी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : शहरात दहशत माजवण्यासाठी जवळ देशी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पर्वती पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने पकडले आहे. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६/०८/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी विशाल राऊत व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिंदे, रणजित घाटो यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तपास पथक प्रमुख विशाल राऊत यांनी सापळा रचून आरोपीला पकडले.

आरोपीचे नाव अनिकेत वाघू कसबे, वय २४ वर्ष, राहणार स.नं. १३३, राजीव गांधी नगर, नेर्लेकर हॉस्पिटल जवळ, दांडेकर पूल, पर्वती पायथा, पुणे असे आहे. त्याला अत्यंत शिताफीने पकडून त्याच्या अंगझडतीत एकूण ४९,०००/- रुपये किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल व ४ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर २०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३०(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हा सराईत असून तो परिसरात दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगत होता का, त्याने याआधी कुठे गुन्हा केला आहे का, त्याला हे पिस्तूल कोणी दिले याचा तपास पोलीस करत आहेत. त्याला आणखी साथीदार आहेत का याचाही शोध घेतला जात आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल राऊत, पोलीस उप निरीक्षक प्रकाश खिलारी, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिंदे, रणजित घाटो, स्वप्निल चुरगे, मनोज बनसोडे, राकेश सुर्वे, सूर्या जाधव, गणेश तरंगे, मारुती तांदळे यांनी केली आहे.