PUNE CRIME : पुण्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्या सराईत टोळी जेरबंद, काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई, साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवैध गांजा विक्री आणि पुरवठा करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 8 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी काळेपडळ पोलीस स्टेशनचे तपास पथक कात्रज कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल थोरवे, महादेव शिंदे, नितीन ढोले आणि गिरीराज जगताप यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की एस.आर.पी.एफ. चौकाच्या मैदानात झाडाजवळ एक इसम पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन संशयितरित्या उभा आहे आणि त्याच्याकडे गांजा हा अमली पदार्थ असण्याची शक्यता आहे.

या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीशा निंभाळकर यांना कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, रत्नाकर गायकवाड आणि सहा पोलीस निरीक्षक अमित शेट यांनी पंचासह सापळा रचून योगेश महादू अडसूळ, वय 40 वर्षे, रा. अखिल एकता कॉलनी, रेल्वे गेटजवळ, कात्रज, हडपसर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याजवळ 1 किलो 404 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 455/2026 एनडीपीएस अॅक्ट कलम 20(अ)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान या आरोपीला गांजा पुरवठा करणाऱ्या अन्य पाच जणांची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी 1) विजय राजू तुबकर, वय 25 वर्षे 2) वसंत बाबुराव वाघ, वय 39 वर्षे 3) अशोक उर्फ अक्षय सतीश जाधव, वय 28 वर्षे 4