पुणे : देशभरात प्रेमसंबंधातून झालेल्या हत्या अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातून पुन्हा एकदा प्रेमसंबंधातून चौघा जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. एका वीस वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्यानंतर तीन मित्रांकडून तिच्यावर बलात्कारही केला गेला. ही अत्यंत संतापजनक घटना आहे.
या प्रकरणी फरहान शेख आणि फ़झल शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. साहिल दिंडोरे हा फरार आहे आणि एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. चौघांनी या तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले.