पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत संताप जनक घटना घडली. भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 65 वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर गोठ्यात अत्याचार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं.. या घटनेची माहिती राज्यभरात पसरल्यानंतर या घटनेच्या विरोधात आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय.. पाहूया हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण आणि या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी नेमका कसा केला या स्पेशल रिपोर्ट मधून..
पीडित साडेतीन वर्षीय मुलगी सुट्टीसाठी नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना ६५ वर्षीय संशयित आरोपीने तिला आमिष दाखवून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी त्याने मृतदेह शेणाने झाकल्याचेही उघडकीस आले आहे.कुटुंबीयांनी मुलगी बराच वेळ परत न आल्याने शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ती संशयितासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवत तिचा मृतदेह एका गोठ्यात आढळून आणला. ही माहिती मिळताच गावात मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी माेर्चा काढून बंद पुकारला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदालन केले.या घटनेनंतर नसरापूर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला असून, शनिवारी सकाळी नसरापूर भागताील सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले.
65 वर्षीय व्यक्तीने केवळ साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, या अमानुष घटनेनंतर परिसरात तीव्र भावना व्यक्त होत असून काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही समोर आले. मात्र पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून तपास प्रक्रियेला सहकार्य करण्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, आरोपीबाबत पूर्वी कोणतीही ठोस माहिती नसताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. स्थानिक नागरिकांनीही तपासात सहकार्य केल्याचे पोलिसांनी नमूद