पुणे : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित 686 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 38 हजार 587 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. या सुविधेचा 2 हजार 445 गरोदर महिलांनी लाभ घेतला.
या उपक्रमांतर्गत आंबेगाव 126, बारामती 61, भोर 34, दौंड 49, हवेली 57, इंदापूर 40, जुन्नर 51, खेड 49, मावळ 79, मुळशी 22, पुरंदर 34, शिरूर 73 तर वेल्हा येथे 11 आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
17 सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, योग व ध्यान सत्र, मोतीबिंदू तपासणी, हायपर टेन्शन तपासणी, मधुमेह, कर्करोग तपासणी करण्यात आली असून किशोरवयीन मुलींच्या एचपीव्ही लसीकरण, कुष्ठरोग याबाबत समुपदेशन करण्यात आले.
या शिबिरादरम्यान 4 हजार 126 जोडप्यांना कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन, 26 हजार 815 नागरिकांचे हिमोग्लोबिन तपासणी, 11 हजार 785 मोतीबिंदू तपासणी, राष्ट्रीय संसर्गजन्य कार्यक्रमांतर्गत 32 हजार 365 नागरिकांची हायपरटेन्शन तपासणी, राष्ट्रीय शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत 40 शस्त्रक्रिया यामध्ये 8 हृदय व इतर 32 शस्त्रक्रिया, 735 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले.