PUNE : पुण्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 ऑगस्ट चौकात रस्त्यावर ठेवलेली एक संशयित बॅग लोकांना दिसली. ही बॅग पाहताच स्थानिकांनी लगेच पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण चौक रिकामा केला आणि वाहतूक थांबवली. बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडला बोलावण्यात आले. सध्या बॅगची कसून तपासणी सुरू आहे. बॅगमध्ये नेमके काय आहे, हे अजून समजलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून पुण्याला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या येत आहेत. महापालिका आणि न्यायालयाला ईमेलद्वारे धमकी आली होती. दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबारही झाला होता. त्यामुळे यंत्रणा आधीच अलर्टवर आहे.
आजच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. त्याच वेळी ही बॅग सापडल्याने पुण्याच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उभा राहिला आहे.