Pune : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक - टॉप न्यूज मराठी

पुणे : आगामी दिनांक 1 जानेवारी 2027 रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी हवेली, पुणे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सर्व्हे नंबर 104/105, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर आळंदी रोड, येरवडा पुणे येथे सर्व सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून आपापल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले आहे.