पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्टतर्फे शालेय दप्तर, शूज व सॉक्सचे मोफत वाटप करण्यात आले.
पर्यवेक्षिका अनिता झांबरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे २५० विद्यार्थ्यांना हे साहित्य मोफत मिळवून देण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश पॉल, संचालक रंजना पॉल, संजय सक्सेना, मोहिनिश थडाणी, कुमार किरपलानी, आरती संघवी, प्रीती मेहंद्रू व शालिनी हथिरामानी उपस्थित होत्या.
पॉल व थडाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव सूरजभान आगरवाल होते. यावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांच्यासह ज्येष्ठ संचालक उपस्थित होते. ज्योती जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर मेघमाला खरकांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश दळवी, अनुजा कांबळे, दिवाकर पाटील, सिद्धार्थ आल्हाट, नामदेव गायकवाड, मीनाक्षी शेलार यांनी परिश्रम घेतले.