पुणे : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार डॉ.निलमताई गोऱ्हे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त शीतल तेली -उगले , पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,
पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.