PUNE : आयुष्मान भारत कार्ड मोहिम स्वरुपात राबवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी - टॉप न्यूज मराठी

पुणे : प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आयुष्मान भारत कार्ड मोहिम स्वरुपात राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आयुष्मान भारत कार्डद्वारे पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. त्यामुळे ग्राम विकास, महसूल आणि आरोग्य विभागाने समन्वयाने नोंदणी आणि कार्ड वितरण करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, गरोदर महिलांच्या शासकीय प्रसुती, 100% HPV लसीकरण, क्षयरोगमुक्त ग्राम अभियान आणि पावसाळी आजार प्रतिबंधावर भर देण्याच्या सूचना दिल्या. आशा कार्यकर्त्यांना वेळेत भत्ता देण्यासही सांगितले.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, डॉ. अंबादास देवमाने आणि डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.