पुणे : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून समाजाला ज्ञानशील आणि कर्मशील बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा *गुरुपौर्णिमेनिमित्त* प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात येणार आहे.
विद्या प्रबोधिनी आणि पुनर्निर्माण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची माहिती :
दिनांक: शुक्रवार, दि. 31 जुलै 2026
वेळ: सायंकाळी 5.30 वाजता
स्थळ: बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सन्मानकर्ते : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री *ना. चंद्रकांतदादा पाटील*
या वर्षी सन्मानित होणारे 'समाजगुरू'
1. डॉ. राजेंद्र शेंडे - ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्काराचे सहमानकरी
2. डॉ. भूषण पटवर्धन - कुलपती, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ
3. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर
4. डॉ. अरविंद नवरे - पुण्यातील पहिले कंपनी सचिव, उपाध्यक्ष - पुणे सार्वजनिक सभा
5. आनंद हर्डीकर - ज्येष्ठ लेखक व संपादक
6. मृणालिनी सावंत - लेखिका आणि अनुवादक
7. आनंद माडगूळकर - लेखक, दिग्दर्शक आणि गायक
8. प्रमोद कांबळे - प्रख्यात शिल्पकार
9. अनुराधा कुलकर्णी - इतिहास संशोधक
10. प्रदीप लोखंडे - ग्रंथप्रसारक आणि 'रुरल रिलेशन्स' चे प्रमुख
या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या सन्मानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.