Pranit More Controversy: प्रणित मोरेचा माफीनामा; व्हिडिओ व्हायरल - टॉप न्यूज मराठी

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेने त्याच्या शोमधील वादग्रस्त क्लिप्स आणि वक्तव्यांवर अखेर जाहीर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप आणि कायदेशीर कारवाईचा दबाव वाढल्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली.  

राष्ट्रीय महिला आयोगाने शोमधील अत्यंत आक्षेपार्ह विधानांची दखल घेत थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. माजी महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी करण्याचे ठरवले आहे.  वाढता दबाव आणि कायदेशीर कारवाईची शक्यता पाहता, अखेर प्रणित मोरेने सोशल मीडियावर जाहीर व्हिडिओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे.

माफी मागत असताना प्रणित मोरे प्रामुख्याने खालील गोष्टी म्हणाला, सोशल मीडियावर आपल्यावर जी टीका होत आहे आणि जो द्वेष (Hate) मिळत आहे, तो आपण पूर्णपणे डिझर्व्ह (Deserve) करतो, अशी कबुली त्याने दिली.  

शोदरम्यान त्या प्रेक्षकाने (हिमांशू) अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक गोष्टी बोलल्या. पण तिथे उपस्थित सर्व लोक हसत असल्यामुळे आपणही वाहवत गेलो आणि आपल्याकडून 'लॅप्स ऑफ जजमेंट' (चुकीचा निर्णय) झाला.  

त्या वादग्रस्त विधानाला आपल्या शोच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळेच हा वाद इतका मोठ्या प्रमाणावर वाढला, हे त्याने मान्य केले.  

या स्पष्टीकरणानंतर प्रणितने पुढे असेही म्हटले आहे की, एक शो चालवणारा (Host) म्हणून त्या आक्षेपार्ह विधानाला रोखणे ही त्याची जबाबदारी होती, ज्यामध्ये तो अपयशी ठरला. त्याने भविष्यात अशा चुका होणार नाहीत अशी ग्वाही दिली असून प्रेक्षकांकडे सुधारण्याची एक संधी मागितली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलीस आणि इतर यंत्रणांकडून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत आपण प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत, असे त्याने स्पष्ट केले. 

 

वादाची पार्श्वभूमी:

 प्रणित मोरेच्या एका लाईव्ह 'क्राउडवर्क' शोमध्ये हिमांशू जांगडा या प्रेक्षकाने ₹३७० च्या बिर्याणीच्या बदल्यात एका तरुणीसोबतच्या संमतीविना शारीरिक वसुलीची आक्षेपार्ह भाषा वापरली होती, ज्यावर प्रणितने त्याला न थांबवता 'पीक गुडगाव कंटेंट' म्हणत दाद दिली होती. याच शोमधील दुसऱ्या एका क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार यांनी मृतदेहाच्या (Cadaver) गुप्तांगांवर अश्लील टिप्पणी केली होती. या दोन्ही प्रकरणांमुळे राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या तिघांवर गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली आहे. 

#pranitmore 

#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews