महाराष्ट्र : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता आमदार देखील एकनाथ शिंदेंच्या वाटेवर आहेत अशी मोठी बातमी असतानाच, महाराष्ट्रातच नाही तर देशात देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत नव्याने सामील झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांच्या वाटेला मोठं घबाड लागलं आहे अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे म्हटले जात असून खासदार श्रीकांत शिंदे यांना शिक्षण कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते आहे.
त्याचबरोबर खासदार संजय जाधव यांच्या पदरी आरोग्य तर प्रतापराव जाधव यांच्या पदरी केवळ आयुष्य खाते राहणार असल्याचे म्हटले जाते आहे. तर माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील आहे. अनुराग ठाकूर यांना देखील पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये जागा मिळणार आहे अशी माहिती समोर येते आहे.
एकंदरीतच केंद्रात देखील मोठ्या हालचाली होत असून पुढच्या काही वेळातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि कोणत्या खासदाराच्या वाट्याला कोणते मंत्रीपद येते हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.