Pimpri-Chinchwad : निगडी प्राधिकरणात पुन्हा दुर्घटना ! चेंबरमध्ये गुदमरून 2 कामगारांचा मृत्यू, प्रशासनावर नातेवाईकांचा संताप - टॉप न्यूज मराठी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथून एक मोठी घटना समोर येते आहे. लोकमान्य हॉस्पिटलजवळ चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. काल बुधवारी रात्री 12 वाजता दोन कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोघांना बाहेर काढून रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्राथमिक अंदाज काय ?

चेंबरमध्ये उतरताच विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला असावा. रात्री चेंबरमध्ये कोणते काम सुरू होते आणि कामगारांकडे सेफ्टी गिअर होते का ? याबाबत महापालिकेकडून अद्याप माहिती नाही.

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप

गेल्या वर्षीही याच परिसरात अशाच घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तरीही धडा न घेतल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. निगडी प्राधिकरण भागातून लोकमान्य हॉस्पिटलजवळ चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.