प्रसिद्ध अभिनेते, जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी तिसरी पत्नी अन्ना कोनिडेला यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. सोमवारी रात्री दोघांनी संयुक्त निवेदनातून 13 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिल्याचे जाहीर केले. पवन कल्याण यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली.
निवेदनात दोघांनी हा निर्णय परस्पर समंजस्य आणि आदराने घेतल्याचे सांगितले आहे. संसार संपला असला तरी आम्ही चांगले मित्र म्हणून राहू, मुलांसाठी समर्पित आई वडील म्हणून कायम राहू, त्यांचा आनंद आणि काळजी हीच आमची सामायिक प्राधान्यता राहील, असे त्यांनी म्हटले आहे. या वैयक्तिक बदलाच्या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
घटस्फोटाचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे सिनेसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पवन कल्याण यांचे पहिले लग्न 1997 मध्ये नंदिनी यांच्याशी झाले होते. 1999 मध्ये ते विभक्त झाले. 2009 मध्ये त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. 2012 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2013 मध्ये त्यांनी रशियाच्या अन्ना यांच्याशी लग्न केले. या दोघांना देखील दोन मुले आहेत.