PARENTING TIPS : रविवारी लहान मुलं सारखा मोबाईल मागतात का ? मोबाईलशिवाय घरीच व्यस्त ठेवण्यासाठी 5 भारी खेळ, पालकांसाठी खास टिप्स - टॉप न्यूज मराठी

रविवार आला की लहान मुलांची शाळा बंद आणि दिवसभर एकच रडगाणं, मम्मी मोबाईल दे. दिवसभर मोबाईल पाहिल्याने डोळे खराब होतात, चिडचिड वाढते आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 असे खेळ सांगणार आहोत जे घरीच खेळता येतील आणि मुलं मोबाईल विसरून जातील.

1. खजिना शोधा गेम

हा खेळ मुलांना खूप आवडतो. घरात एखादी वस्तू, जसे चॉकलेट, एखादे खेळणे लपवा. मग मुलाला चिठ्ठ्या द्या. पहिल्या चिठ्ठीत लिहा तुझा पुढचा क्लू किचनमध्ये आहे, दुसऱ्या चिठ्ठीत बेडरूममध्ये आहे. अशा 4 ते 5 चिठ्ठ्या बनवा. शेवटच्या चिठ्ठीत खजिना असेल. याने मुलांची बुद्धी वाढते आणि 1 तास आरामात जातो. तुम्ही पण त्यांच्यासोबत सहभागी व्हा.

2. घरातच चित्रकला स्पर्धा

एका मोठ्या कागदावर किंवा जुन्या वर्तमानपत्रावर मुलांना चित्र काढायला सांगा. विषय द्या, जसे माझे स्वप्नातील घर, किंवा जंगल. त्यांना रंग द्या. जो चांगले चित्र काढेल त्याला छोटे बक्षीस द्या. याने मुलांची कल्पनाशक्ती वाढते. मोबाईलपेक्षा हा रंगाचा खेळ त्यांना जास्त आवडेल. तुम्ही पण एक चित्र काढा, मुलं खुश होतील.

3. घरातील वस्तूंपासून विज्ञान प्रयोग

घरातच सोपा प्रयोग करा. एका ग्लासात पाणी, त्यात थोडे तेल आणि रंग टाका, मग त्यात सोडा टाका, लाव्हा तयार होतो. किंवा बटाट्यापासून बॅटरी बनवणे. युट्युबवर असे बरेच सोपे प्रयोग आहेत जे घरी करता येतात. याने मुलांना विज्ञानाची गोडी लागते आणि मोबाईल गेमपेक्षा खरा गेम जास्त भारी वाटतो.

4. कथा तयार करण्याचा खेळ

सगळे कुटुंब गोल बसा. एक जण कथेची सुरुवात करेल, एका जंगलात एक सिंह होता. पुढच्या व्यक्तीने त्यात एक वाक्य जोडायचे. अशा पद्धतीने कथा वाढत जाते. खूप गंमत येते आणि मुलांची बोलण्याची भीती पण जाते. या खेळात आजी आजोबांना पण सामील करा, त्यांना पण मजा येईल. रविवार दुपारसाठी हा बेस्ट खेळ आहे.

5. घरातच लपाछपी आणि घर घर खेळ

आपण लहानपणी जे खेळ खेळायचो तेच खेळ मुलांना खेळायला लावा. लपाछपी, पकडापकडी, दुकान दुकान, डॉक्टर डॉक्टर. यासाठी मोठ्या जागेची गरज नाही. घरातच कपाटाच्या मागे लपणे, पडद्यामागे लपणे यात मुलं खूप खुश होतात. संध्याकाळी टेरेसवर गेलात तर तिथे बॅडमिंटन किंवा लंगडी पण खेळू शकता.

पालकांसाठी एक महत्वाची टीप

मुलं मोबाईल मागतात कारण त्यांना कंटाळा येतो. तुम्ही जर त्यांना वेळ दिला नाही तर ते मोबाईलकडेच जाणार. म्हणून रविवारी फक्त अर्धा तास मोबाईल बंद ठेवा आणि मुलांसोबत हे खेळ खेळा. मुलं मोबाईलपेक्षा तुमच्यासोबत जास्त खुश राहतील.

रविवार सुट्टीचा आनंद मोबाईलमध्ये नाही तर मुलांसोबत वेळ घालवण्यात आहे.