नाशिक : त्र्यंबकेश्वर Trambakeshvar येथून 30 जून रोजी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या nivruttinath maharaj palakhi पालखीने पंढरपूरची वाट धरली आहे. आज ही पालखी नाशिक nashik शहरात दाखल झाली आहे. हरी मुखे म्हणाच्या गजरात हजारो वारकरी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. यावेळी शहराच्या महापौर हिमगौरी अडगे, उपमहापौर विलास शिंदे अनेक साधू महंत आणि नागरिक पालखीच्या दर्शनासाठी जमले होते. यावेळी जेसीबी मधून महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
आता प्रत्येक वारकऱ्याला ओढ लागली आहे ती विठ्ठलाच्या दर्शनाची. त्यामुळे हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पालखीसोबत टाळ मृदुंगाच्या निनादात प्रस्थान करत आहेत.