अफगाणिस्तान : रविवारी आणि सोमवारी पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या निवासी भागांमध्ये हवाई हल्ले करून अनेक सामान्य नागरिकांना जखमी केले. शेकडोहून अधिक नागरिक जखमी झाले असून आत्तापर्यंत 35 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराचीमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आल्याच्या सूडबुद्धीने पाकिस्तानने रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. तहरीक-ए-तालिबान आणि 'जमात-उल-अहरार या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा आहे . जाते परंतु ज्या ठिकाणी हल्ले करण्यात आले तो भाग निवासी भाग असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे.
तर या हल्ल्यांमध्ये शेकडो सामान्य नागरिक जखमी झाले असून 35 हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याने पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्याबाबत अफगाणिस्तानने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अफगाणिस्तानमधून अनेक व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसून येत आहे की, मृतांमध्ये सामान्य नागरिक असून लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे.
पाकिस्तानचे मंत्री आत्ताउल्हाहार तरार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यांमध्ये 25 दहशतवादी मारले गेले असल्याचे म्हटलं जात असून या हवाई हल्ल्यांमध्ये एकही लष्करी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी बाधित झालेला नाही तर सर्व सामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे असे अफगाणिस्तानचे म्हंटले आहे. या घटनेने आता पाक अफगाणमधील वातावरण अधिक चिघळलेले आहे.