Padma Shri Achyut Palav : सुलेखनकार अच्युत पालव यांना सिडनीच्या” पब्लिशर्स इंटरनॅशनल “या संस्थेचे आमंत्रण - टॉप न्यूज मराठी

ऑस्टेलियातील सिडनी येथे दिवाळी निमित्त होणार्‍या कार्यक्रमात ज्येष्ठ भारतीय सुलेखनकार पद्म श्री अच्युत पालव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सिडनीतील मान्यवरांना आणि उद्योजकांना बोलावण्यात येते. या समारंभात अच्युत पालव हे सुलेखनाविषयी गप्पा, अनुभव आणि संगीताच्या साथीनं प्रात्यक्षिकं कॅनव्हासवर करणार आहेत. या शिवाय ऑस्टेलियातील स्थानिक कलाकार श्रद्धा गुप्ते यांच्या कला संस्थेला भेट देऊन स्थानिक मराठी तरूण मंडळींशी संवाद साधणार आहेत. यावेळी रसिकांच्या विनंतीनुसार मराठी सुलेखनाची प्रात्यक्षिकं होतील. 12ऑक्टोबर ला सिडनी ला रवाना होणार आहेत .

मराठी सुलेखनाला जगभर तसेच आजच्या पिढीला थोड्याफार प्रमाणात धडे दिले गेले तर भविष्यात मराठी भाषेबरोबर मराठी सुलेखन कलाही पाहावयास मिळेल. अच्युत पालव यांनी आतापर्यंत जर्मनी, रशिया, फ्रान्स, लंडन, नेदरलँड, अमेरिका, सिंगापूर, दुबई, अल्जेरिया, चायना आदि देशांमध्ये देवनागरी सुलेखन कला प्रदर्शन आणि व्याख्यानाद्वारे सादर केली आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रपती भवनात `हम भारत के लोग' हे अकरा भाषेतील सुलेखन पेंटींग लावल्यामुळे सुलेखन कलेला भारतात एक वेगळा बहुमान प्राप्त झालेला आहे, असे जेष्ठ सुलेखनकार पद्म श्री अच्युत पालव यांनी सांगितले आहे.