मुंबई : 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची साथ सोडल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पण हा तर केवळ ट्रेलर होता मेन पिक्चरमध्ये आता 20 पैकी 14 आमदार देखील शिंदे Eknath shinde यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांना राम राम ठोकून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर हे खासदार थेट शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले आहेत. परंतु हे ऑपरेशन टायगर आता 0.2 सुरू होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. दरम्यान काल विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर होते. सध्या शिंदे हे ऑपरेशन टायगर 0.2 Operation Tiger 0.2 या 14 आमदारांच्या बैठकीमध्ये मशगुल असल्याचं बोललं जात आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या ठाकरे गटातील तब्बल 14 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्तस्थळी भेट घेतली आहे. ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत.
दरम्यान खासदारांची पळापळी रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गठान बैठकींचे व्हीप जारी केले होते. तरीही या बैठकीमध्ये खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर आता आमदारांच्या फुटाफुटीने उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसतो की काय हे लवकरच स्पष्ट होईल.