OMRAJE NIMBALKAR : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवसाठी 18 कोटींचा निधी मंजूर, जिल्ह्यातील संघटनांच्या कार्यकारणी बरखास्त; धाराशिवमध्ये राजकीय हालचालींना वेग - टॉप न्यूज मराठी

धाराशिव : महाराष्ट्राच्या राजकारणात Maharashtra Politics ऑपरेशन टायगरने मोठी खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील सहा खासदारांनी अधिकृत प्रवेश केला आहे. यानंतर आता धाराशिंवच्या Dharashiv राजकारणाच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी मोठमोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विविध विकास कामांच्या दृष्टीने 18 कोटींचा मोठा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर करून दिला आहे. धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी हा निधी तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आल्या आहेत. पक्षप्रवेश केल्यानंतर काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठमोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. पक्षातील सहा खासदारांनी 17 जून रोजी थेट दिल्ली गाठून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. त्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीने हे सहा खासदार अंडरग्राउंड झाले आहेत.

16 जून रोजी परभणी खासदार संजय जाधव यवतमाळ वाशिम खासदार संजय देशमुख, हिंगोली खासदार नागेश पाटील अष्टीकर, धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर ,शिर्डी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि मुंबई ईशान्य खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी होऊन एकनाथ शिंदे सोबत बैठक घेतली. त्यानंतर या सहा खासदारांनी 17 जून रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याबाबत बैठक घेतली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती