Nusrat Bharucha Injured : बालीमध्ये शूटिंगदरम्यान दुर्घटना, अभिनेत्री नुसरत भरुचा जखमी, हॉस्पिटलमध्ये दाखल - टॉप न्यूज मराठी

Nusrat Bharucha injured : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडोनेशियातील बाली येथे तिच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. कामासाठी ती बालीमध्ये गेली असताना ही घटना घडली. अपघातात नुसरतला दुखापत झाली असून तिला लगेच तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या दुखापतीबाबत डॉक्टरांनी अजून काहीही स्पष्ट सांगितलेले नाही. मात्र तिला बरे वाटेपर्यंत बालीमध्येच थांबावे लागणार आहे. त्यामुळे तिचा भारतात परतण्याचा प्लॅन लांबणीवर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बालीमधील बीचवरील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते आणि त्यानंतरच ही घटना घडली.

या काळात ती टायगर श्रॉफ सोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करत होती. हा सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. या सिनेमात पहिल्यांदाच टायगर आणि नुसरतची जोडी एकत्र पाहायला मिळणार होती. या टीमला अशी अभिनेत्री हवी होती जी इमोशनल सीन चांगले करू शकेल आणि म्हणून नुसरतला घेतले होते. या सिनेमात तिच्यासोबत पश्मिना रोशन, अभिषेक बॅनर्जी आणि युट्यूबर एलविश यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता नुसरतच्या अपघातामुळे या सिनेमाचे शूटिंग थांबले आहे.

नुसरतसोबत असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2023 मध्ये अकेली सिनेमाच्या सेटवर धावण्याचा सीन करताना ती संगमरवरी जमिनीवर पडली आणि डोक्याला मार लागला होता. अर्धा तास ती वेदनेने रडत होती. त्याच वर्षी छोरी 2 चे शूटिंग करताना अॅक्शन सीनमध्ये तिच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली होती आणि भुवयांवर टाके घालावे लागले होते.

नुसरतने आपल्या करिअरमध्ये प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी, ड्रीम गर्ल, छलांग आणि छोरी सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.