मोबाईल, इंटरनेटपासून पूर्णपणे दूर; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर 24 तास नजर, एकाच ठिकाणी राहण्याचे कडक नियम
नीट पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्रालय आणि National Testing Agency म्हणजेच NTA आता 21 जून रोजी होणाऱ्या Re-exam साठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी प्रश्नपत्रिका तयार करणारे, त्याचे मॉडरेशन करणारे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करणारे तज्ज्ञ गुप्त ठिकाणी पूर्णपणे लॉकडाउण ठेवण्यात आले आहेत. परीक्षा संपेपर्यंत त्यांना बाहेर कोणाशीही संपर्क ठेवण्याची परवानगी नसणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी मोबाइल फोन, लॅपटॉप, इंटरनेट आणि स्मार्टवॉच यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पेपर लीक होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये वाटण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीकडे संपूर्ण माहिती किंवा नियंत्रण नसणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच IAF च्या विमानांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा गुप्त राघण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #neetpaperleak