नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' च्या आंदोलनानंतर आता 'E20 जनता पार्टी' नावाची नवी ऑनलाईन चळवळ चर्चेत आहे. ई20 इंधनाविरोधात पुकारण्यात आलेल्या या व्हर्च्युअल आंदोलनाला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
'E20 जनता पार्टी' या सोशल मीडिया खात्याला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. ई20 इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होते, मायलेज कमी होते आणि जुन्या गाड्यांना ते नुकसानकारक आहे, असा दावा या चळवळीतून केला जात आहे. कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर आता ही दुसरी मोठी ऑनलाईन चळवळ उभी राहिली आहे.
ई20 इंधनावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यानच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बाजूने न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने या निर्णयात E20 इंधनाबाबत सरकारची भूमिका आणि धोरणाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर E20 इंधनाविरोधात पोस्ट करताना, माहिती शेअर करताना नेटकऱ्यांनी काळजी घ्यावी लागणार आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा यातून मिळतो.
1. एकीकडे लोक "आमच्या जुन्या गाड्या E20 मुळे खराब होतील" अशी भीती व्यक्त करत आहेत.
2. तर दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयानंतर "आता जबाबदारीने पोस्ट करा" अशा प्रतिक्रिया येत आहेत.
ई20 हे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे. केंद्र सरकारने 2025 पर्यंत ते संपूर्ण देशात लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'E20 जनता पार्टी' चळवळीचे पुढील पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.