स्वयंपाकघरातील भिंती आणि फरशा सहज स्वच्छ करता येतील अशा (Easy-to-clean Tiles) असाव्यात. हवेच्या देवाणघेवाणीसाठी योग्य वेंटिलेशन आणि एक्झॉस्ट फॅन असणे अनिवार्य आहे.
विभक्त साठवणूक (Storage): कच्चा माल आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवता येणार नाही. तसेच शाकाहारी (Veg) आणि मांसाहारी (Non-Veg) अन्नपदार्थ साठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल.
कीटक नियंत्रण (Pest Control): झुरळे, उंदीर आणि माश्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटेल्सना नियमित 'पेस्ट कंट्रोल' करावे लागेल आणि स्वयंपाकघरात इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप (Fly Traps) लावावे लागतील.
ग्राहकांसाठी स्वच्छता: हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी शुद्ध पाणी, साबण, हँडवॉश आणि स्वच्छ टॉवेलची योग्य सुविधा असणे बंधनकारक आहे.
विनामूल्य शुद्ध पाणी: प्रत्येक हॉटेलला ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
बाटलीबंद पाण्याची सक्ती नाही: हॉटेलमधील जेवणाच्या टेबलावर आधीच विकतच्या पाण्याच्या बाटल्या (Mineral Water Bottles) ठेवून ग्राहकांवर दबाव आणता येणार नाही. ग्राहकाने स्वतःहून मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी दिले जाईल.
ठळक फलक : "येथे शुद्ध पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध आहे", अशा आशयाचा स्पष्ट आणि मोठा फलक हॉटेलच्या दर्शनी भागावर (Entrance/Billing Counter) लावणे सक्तीचे आहे.