दिल्ली : सध्या संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान कालचा दिवस दिल्लीने मोठा गदारोळ पाहिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आरंभलेल उपोषण आणि काल थेट संसदेवर धडकलेला कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा यामुळे दिल्ली तापली आहे.
कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मंजूर करण्यात यावे,या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर भाजप नेते जे पी नड्डा यांनी निवेदन स्वीकारले असून हे उपोषण आता थांबवावे असे आवाहन केलं. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपोषण आणि पेपर फुटी प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सरकार विद्यार्थ्यांबद्दल खूप संवेदनशील आहे. नीट पेपर लीक प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे. फेरपरीक्षा घेण्यात आली. निकालाला विलंब झाला नाही. पुढे पेपर लीक होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलले जातील. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा फक्त एका राज्याचा नाही संपूर्ण देशाचा विषय आहे. या विषयात पक्षीय राजकारण होऊ नये." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.