NEET पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून तिसरी अटक बायोलॉजी प्रोफेसर मनीषा मांढरे CBI च्या ताब्यात - टॉप न्यूज मराठी

नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातून सलग तिसरी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही अटक एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये बायोलॉजी प्रोफेसर ला झाली आहे.‌ मनीषा मांढरे असं या प्रोफेसरचं नाव आहे. पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये ही प्रोफेसर सुद्धा शामिल असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

मनीषा मांढरे ही प्रोफेसर म्हणून पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहे. ती गेल्या चार-पाच वर्षांपासून एनटीए सोबत काम करत आहे. त्यामुळे एनटीएच्या माध्यमातून सेट केला जाणारा नीटच्या पेपर बाबत मांढरेला पूर्वकल्पना असते. त्यामुळेच तिने आधी अटक झालेल्या प्रोफेसर कुलकर्णी प्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरं सांगितली होती. मध्यस्थी असलेल्या मनीषा वाघमारेच्या घरी जे स्पेशल कोचिंग क्लास घेण्यात आले, त्यामध्ये मांढरे ने देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे त्या रॅकेटमध्ये तिचा देखील सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणी सीबीआयने धडक कारवाई करत पुण्यातून मांढरेला अटक केली.