NAVARATRA UTSAV 2026 : शारदीय नवरात्र 2026 चे नऊ रंग ! जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता रंग आणि त्याचा अर्थ काय - टॉप न्यूज मराठी

या वर्षी शारदीय नवरात्र 11 ऑक्टोबर 2026, रविवार पासून सुरू होत आहे आणि 19 ऑक्टोबर सोमवार पर्यंत आहे. 20 ऑक्टोबर मंगळवारी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. या वर्षी नवरात्र रविवार पासून सुरू होत असल्यामुळे पहिला रंग केशरी आहे.

नऊ दिवसांचे रंग आणि महत्त्व -

दिवस 1 - 11 ऑक्टोबर, रविवार - केशरी रंग - देवी शैलपुत्री

केशरी रंग उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हा रंग पराक्रम आणि त्याग दर्शवतो. या दिवशी केशरी रंग परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो.

दिवस 2 - 12 ऑक्टोबर, सोमवार - पांढरा रंग - देवी ब्रह्मचारिणी

पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. मन शांत ठेवण्यासाठी आणि देवीची कृपा मिळवण्यासाठी हा रंग शुभ मानला जातो.

दिवस 3 - 13 ऑक्टोबर, मंगळवार - लाल रंग - देवी चंद्रघंटा

लाल रंग शक्ती, प्रेम आणि धैर्याचे प्रतीक आहे. नवरात्रीत लाल रंग सर्वात शुभ मानला जातो. हा रंग वाईट शक्तींना दूर करतो.

दिवस 4 - 14 ऑक्टोबर, बुधवार - रॉयल ब्लू - देवी कुष्मांडा

रॉयल ब्लू रंग समृद्धी, आत्मविश्वास आणि शांततेचे प्रतीक आहे. हा राजेशाही रंग असून सुख आणि वैभव देतो.

दिवस 5 - 15 ऑक्टोबर, गुरुवार - पिवळा रंग - देवी स्कंदमाता

पिवळा रंग आनंद, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. हा रंग ज्ञान वाढवतो आणि मन प्रसन्न ठेवतो.

दिवस 6 - 16 ऑक्टोबर, शुक्रवार - हिरवा रंग - देवी कात्यायनी

हिरवा रंग निसर्ग, वाढ आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. समृद्धी आणि शांतीसाठी हिरवा रंग घातला जातो.

दिवस 7 - 17 ऑक्टोबर, शनिवार - राखाडी रंग - देवी कालरात्री

राखाडी रंग संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. वाईट प्रवृत्ती नष्ट करून चांगल्या मार्गावर नेणारा हा रंग आहे.

दिवस 8 - 18 ऑक्टोबर, रविवार - जांभळा रंग - देवी महागौरी

जांभळा रंग अध्यात्म, भक्ती आणि वैभवाचे प्रतीक आहे. हा रंग बुद्धिमत्ता आणि शांती देतो.

दिवस 9 - 19 ऑक्टोबर, सोमवार - मोरपंखी हिरवा - देवी सिद्धिदात्री

मोरपंखी रंग करुणा, प्रेम आणि नाविन्यतेचे प्रतीक आहे. हा रंग सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला जातो.