‎Nari shakti vandan | Women Reservation | नारी शक्ती वंदन विधेयक' संसदेत रखडल्याने साताऱ्यात संतापाची लाट ! - टॉप न्यूज मराठी

संसदेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ मंजूर न झाल्याने आता रणकंदन सुरू झालंय. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत, साताऱ्यात भाजपच्या वतीने भव्य 'जनआक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून काँग्रेसचा निषेध केलाय. ‎महिलांना न्याय आणि हक्क मिळवून देणारे 'नारी शक्ती वंदन विधेयक' संसदेत रखडल्याने साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. भाजप महिला मोर्चा आणि सातारा जिल्हा भाजपच्या वतीने या निषेधार्थ जनआक्रोश पदयात्रा काढण्यात आली.या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या विधेयकाचे श्रेय मिळू नये, याच आकसापोटी काँग्रेसने याला विरोध केल्याची टीका यावेळी करण्यात आली.विरोधी पक्षांच्या या भूमिकेमुळे महिलांच्या हक्कांवर गदा आली असून, आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचे संकेत भाजपने दिले आहेत.