NANDED MPSC KARAN GAIKWAD NEWS : हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत बनला महसूल सहाय्यक - टॉप न्यूज मराठी

मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचाच प्रत्यय आलाय नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात... 

घरी अठरा विश्व दारिद्र्य अल्पवृष्टी संघर्ष पाचवीला पुजलेला... पण तरुणांना जिद्द न सोडता मेहनत घेतली आणि

 एमपीएससी परीक्षा पास होत महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली याच तरुणाच्या जिद्दीची ही कहाणी...

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील करण तुकाराम गायकवाड या विद्यार्थ्याच्या जिद्दीची ही कहाणी..

 वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारीकरणवर आली घरी आई, बहिण व लहान भाऊ असं कुटुंब.. पहिले 

ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे राजाबाई हायस्कूल व नंतर पालम या ठिकाणी शिक्षण घेतलं... 

पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीचा शिक्षण घेतलेल्या करनने 2023 पासून स्पर्धा परीक्षा देण्याची सुरुवात केली... आ

णि दुसऱ्या प्रयत्नात तो सहाय्यक महसूल अधिकारी झालाय... 

मात्र यावरच न थांबता त्यानं आणखी मेहनतीची तयारी करत वर्ग एकचा अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलंय