Nagraj Manjule : कोण आहेत सैराट फेम नागराज मंजुळेंच्या दुसऱ्या पत्नी ? मंजुळेंची खऱ्या आयुष्यातली प्रेम कहाणी - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन : सैराट या मराठी चित्रपटांना प्रेम कहानी मध्ये एक बेंच मार्क सेट केला आहे अगदी बॉलीवूड ने देखील सैराटचा रिमेक केला नवख्या तरुण मुलांना देखील घडवणारे नागराज मंजुळे यांच्या खऱ्या आयुष्यातली प्रेम कहानी देखील तितकीच खास आहे. 2017 साली नागराज मंजुळे यांनी पुन्हा लग्न केलं ते गार्गी कुलकर्णी यांच्याशी आणि आता दोघेजण आठ पाठ नावाच्या प्रोडक्शन हाऊस चालवतात त्यांच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात देखील खऱ्या अर्थानं साथ देणाऱ्या कुलकर्णी यांच्यासोबत नागराज मंजुळे आता सुखी संसार करत आहेत. 

खरंतर 1997 साली नागराज मंजुळे यांचा पहिलं लग्न झालं. त्यावेळी ते स्वतः नुकतेच बारावी झाले होते. आणि त्यांच्या पहिल्या पत्नी देखील वयाने लहान होत्या. त्यांचं पहिलं लग्न हे सुमारे 17 वर्षे चाललं 2014 साली दोघांनी घटस्फोट घेतला. हा घटस्फोट नेमका का झाला यावर भाष्य करण्याचं नागराज मंजुळे हे टाळतात. परंतु त्यानंतर नागराज मंजुळे यांनी 2017 साली गार्गी कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं. 

कोण आहेत गार्गी कुलकर्णी 

गार्गी कुलकर्णी यांच्याशी नागराज मंजुळे यांची भेट अहिल्यानगरमध्ये झाली असं सांगितलं जातं. दरम्यान 2017 मध्ये दोघांनी लग्न गाठ बांधली. गार्गी कुलकर्णी यांना वाचनाची आणि कविता लिहिण्याची आवड आहे. सध्या नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी मिळून आटपाट नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवतात. व्यवसायिक जीवनात देखील दुसऱ्या लग्नानंतर नागराज मंजुळे यशस्वी होत आहेत. तर वैयक्तिक आयुष्य देखील राया आणि शंभू नावाच्या दोन मुलांसोबत ते आनंदात जगत आहेत.