Mumbai Water Crisis : मुंबईकरांसाठी काळजी करण्यासारखी बातमी धरणातील पाणीसाठा 7 टक्क्यांवर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : यावर्षी पावसानं महाराष्ट्राला चांगलीच ओढ दिली आहे. जून महिना पूर्ण संपला आहे. अद्यापही पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. जुलैमध्ये हवामान खात्याने चांगला पाऊस Rain Update सुरू होईल अशी आशादायक माहिती दिली असली, तरी मुंबईकरांसाठी Mumbai मात्र काळजी करण्यासाठी बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 7 टक्के पाणीसाठा Mumbai Water Crisis  शिल्लक असल्याची माहिती समोर येते आहे. 

सध्या मुंबईमध्ये पाणी कपात सुरू आहे. परंतु पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने मुंबईकरांच्या काळजीमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जर पावसाने आणखीन ओढ दिली तर अत्याधिक पाणी कपात करावी लागेल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एक जुलैपासून ते नऊ जुलै पर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस होऊ शकतो.त्यामुळे आता मुंबईकरांचे पाण्याचे गणित हे येणाऱ्या पावसावर निर्भर आहे. अन्यथा मुंबईला मोठ्या प्रमाणावर पाणी कपातीलच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.