Mumbai Rain Update : मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार ! अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने रिक्षा बुडाली, जनजीवन विस्कळीत - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाराष्ट्राला पावसाने जून महिन्यापर्यंत चांगलीच ओढ दिली होती. उष्णतेने हैराण झालेले नागरिक आता पावसाचा कहर पाहून थक्क झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एक जुलैपासून धुवाधार पावसाला सुरुवात Mumbai Rain Update झाली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. मुंबईला देखील एक जुलैपासून पावसानं तुफान झोडपल आहे. 

दरम्यान मुंबईमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, सांताक्रुज, वांद्रे या भागांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. दरम्यान मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. आज सकाळी अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला. यामध्ये एक रिक्षा पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती आहे. सुदैवानं या रिक्षा चालकाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

मुंबईमध्ये सध्या अतिवृष्टी सुरूच आहे. तर पुढच्या पाच ते सहा दिवसांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनानं आता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यास सुरुवात तर केलीच आहे. तर दुसरीकडे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते आहे. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे आणि पावसाची धुवाधार बॅटिंग यामुळे नागरिकांना रोजचे दळणवळण करण्यास सोईस्कर नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे.