राज्यभरात काल पासून मॉन्सून दाखल झालाा आहे. पहिल्याच दिवसात पावसाने नाकी नऊ आणलं आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दादर परिसरात झाड गाडीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. कुर्ला, सायन सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने दिलासा मिळाला आहे. अंधेरी सबवे बंद आहे. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका आता थेट लोकांच्या घरपर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे समोर येत आहे.
राधा कृष्ण सोसायटीतील रहिवाशांच्या घरात रात्री पानी शिरले. त्यामुळे या सोसायटीतील लोकांनी रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम केले. सध्या पावसाचा जोर कमी झालाा आहे. घरांमधील पानी ओसरले आहे. मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती बिघडण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
पुढील 3 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दादर, माटुंगा, सायन, अंधेरी, कुर्ला या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्यभरात पण हीच स्थिती आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहराला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून घरातील पाणी बाहेर काढावे लागले. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. दरम्यान, खामगाव, शेगाव, संग्रामपूरसह जिल्ह्यातील अनेक शहरी आणि ग्रामीण भागांतही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आता हा पाऊस आणखी किती दिवस टिकतो आणि खरीप हंगामासाठी किती दिलासादायक ठरतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #mumbaimonsoon #mumbainews