MUMBAI CRIME : मुंबईत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पडदाफाश; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सुटका - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईतील गिरगाव सारख्या परिसरातून हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे धक्कादायक म्हणजे या धडक कारवाई मधून एका मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीची सुटका करण्यात आली असल्याची माहिती आहे त्याचबरोबर दुसरी अभिनेत्री देखील हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केलेली अभिनेत्री आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी धाड टाकून सेलिब्रिटींसोबत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या दलालास रंगेहात पकडले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावमधील एका हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता सेलिब्रिटींचा मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या दलालास रंगेहात पकडले आहे. तर मराठी चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका केलेली अभिनेत्री आणि हिंदी बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या एका अभिनेत्रीची यातून सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी आता गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहकाला पाठवून सापळा रचण्यात आला. त्यानंतर खात्री होताच छापा टाकून या महिलांची सुटका करण्यात आली. दरम्यान या महिलांना देह व्यापार करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. आणि अभिनेत्री असल्याकारणाने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा उकळला जात होता. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करून आरोपी ताब्यात घेतला आहे. सहआरोपींबाबत तपास सुरू आहे.