MUMBAI CRIME : भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत विषारी गोळ्यांचे वाटप करणाऱ्यास वेळेत पकडले, पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईच्या भायखळा भागातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. 26 जून रोजी मोहरमच्या मिरवणुकीमध्ये एका संशयित व्यक्तीला काही गोळ्या वाटताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धक्कादायक म्हणजे घातपाताच्या उद्देशाने त्याने विषारी घटक असलेल्या या गोळ्या वाटण्याचा कट रचल्याच तपासात उघडकीस आल आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलाय मुंबईतील भायखळा भागामध्ये शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीतून फैयाज प्रेमजी याच्याकडे एक ग्रॅम झिंक फॉस्फेट सापडल आहे.  हा विषारी घटक असून पोलिसांनी गोळ्या वाटप होण्याआधीच त्याला पकडल आहे. दरम्यान या आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी फैयाज प्रेमजी यांनी या गोळ्या वाटण्याची परवानगी घेतली नव्हती. चौकशी केल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली आहे. दरम्यान गोळी घेतल्यामुळे एका व्यक्तीची तब्येत देखील खराब झाली आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे. भायखळा पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.