मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन 32 व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान देशातील अनेक मोठे नेते, संघटना आणि अभिनेते दिल्लीमध्ये दाखल होऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही मैदानावर उतरून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला.
दरम्यान आज महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधून चर्चा केल्याची माहिती मिळते आहे.
ठाकरे गटाच्या वतीने उद्या 24 जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांततापूर्ण मार्गाने ही भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत उद्या मुंबईतील वातावरण या रॅलीमुळे तापणार आहे.
आंदोलन चिघळण्याची शक्यता
देशात सध्या सर्वच स्तरातून कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आंदोलनाला 32 दिवस उलटले आहेत. तरीही कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचे संकेत केंद्र सरकारकडून मिळत नाहीत. त्यामुळे हे आंदोलन चिघळताना दिसत आहे.