मुंबई : एक जुलैपासून मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी अनुचित प्रकार देखील घडले. दरम्यान मुंबई मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्याने मुंबई पुणे प्रवास ठप्प झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार 19 तास हि दरड पडल्यानंतर प्रशासनानं हा मलबा उचलून वाहतूक सुरळीत केले आहे.
-19 तास अथक परिश्रम करून तब्बल 100 टन मलबा हटवण्यात आला आहे.
-अजूनही युद्ध पातळीवर काम सुरू असून नागरिकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.
-लेनची शिस्त पाळावी
-सुरक्षित वेग राखावा
-महामार्ग पोलीस तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना एमएसआरडीसीने जरी केल्या आहेत.
अजूनही मुंबईला पावसाचा तडाखा मिळतो आहे, आणि पुढचे दोन ते तीन दिवस हे जोरदार पावसाचेच आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा. सध्या दोन लेन सुरू असून वाहतूक सुरू करण्यात आली असली तरीही मुंबई, पुणे, कोकण किनार पट्टी, नाशिक या भागांमध्ये प्रवास करणे टाळावे. असे आवाहन प्रशासन करते आहे.