Minister Mangal Prabhat Lodha : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेल आता राज्यभर, शाळा-कॉलेजमध्ये नशामुक्ती समिती स्थापन होणार - टॉप न्यूज मराठी

मुंबई : राज्यात आता 'ड्रग्स फ्री मुंबई' Drugs Free Mumbai अभियानाचा विस्तार होणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा Minister Mangal Prabhat Lodha यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanavis यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती' स्थापन करण्यात येणार आहे.

या समित्यांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविरोधात जनजागृती केली जाईल. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना समुपदेशन देणे, पालक-शिक्षकांमध्ये समन्वय साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन देणे ही जबाबदारी या समित्यांची असेल.

केंद्र सरकारने 2029 पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी केली जात आहे.

30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanavis यांच्या हस्ते 'ड्रग्स फ्री मुंबई' Drugs Free Mumbai अभियानाचा शुभारंभ होणार आहे. हा फक्त कार्यक्रम नसून वर्षभर चालणारी जनचळवळ आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, एनएस, एनसी यांचा सहभाग असेल. शाळा-कॉलेजमध्ये वर्षभर जनजागृतीपर उपक्रम आणि समुपदेशन सत्रे घेतली जाणार आहेत.

व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.