राजकारण : मनोज जरांगे पाटील यांनी एक क्लिप व्हायरल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमुळे सत्ताधारी, विशेषत: भाजप अडचणीत आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून या क्लिपच्या उगमावर आणि त्यामागील हेतूवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, ही क्लिप नेमकी आली कुठून आणि यामागचा प्लान किती भयंकर आहे याचा विचार करायला हवा. मनोज जरांगे यांच्या विरोधात नेमके काय सुरू आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. या क्लिपने निर्माण झालेल्या चर्चेवर राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्यातील आशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या व्हायरल क्लिपमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी रुपये घेऊन ते मनोज जरांगे यांना दिले अशा आशयाचा दावा केला जात असल्याचे समजते. मात्र या क्लिपमधील संभाषणाची सत्यता अद्याप तपासण्यात आलेली नाही आणि यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.