MAHARASHTRA POLITICS : आज सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे गट घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट, मांडणार बाजू; त्या बंडखोर खासदारांना ...! - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या ऑपरेशन टायगरने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray गोटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आज दिनांक 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला Om Birla यांची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी बोलावलं आहे. या भेटीमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांना आपली बाजू मांडण्यासाठी सांगितले असून या भेटीमध्ये बंडखोर खासदारांच्या गटाला परवानगी मिळू नये अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती देखील मिळते आहे. दरम्यान आज 5 वाजता खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचे समजते.

16 जून रोजी परभणी खासदार संजय जाधव, यवतमाळ-वाशिम खासदार संजय देशमुख, हिंगोली खासदार नागेश पाटील अष्टीकर, धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि मुंबई ईशान्य खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी होऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेतली. त्यानंतर या सहा खासदारांनी 17 जून रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याबाबत माहिती दिली होती. 

या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता आज दिल्लीमध्ये खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक घेऊन या बंडखोर खासदारांना गट स्थापन करण्यासाठी परवानगी देऊ नका अशी विनंती करणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आज सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके कोणते नवीन वळण मिळते हे चित्र स्पष्ट होण्यास आधार मिळेल.