मुंबई : येत्या पंधरा दिवसात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट एनडीए NDA मध्ये सामील होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे सकाळपासून जयंत पाटील Jayant Patil यांना नवीन अर्थमंत्री पद मिळणार अशी चर्चा असतानाच आता पार्थ पवार Parth Pawar यांना केंद्रात मंत्री पद मिळावे अशी मागणी केली जाते.
एकीकडे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार यांच्या नावाचे शिफारस पत्र दिले आहे. पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पद मिळावे अशी मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
दोनच दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीनंतर जयंत पाटील यांना आता अर्थ खात दिल जाणार अशा चर्चेला अधिक हवा मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवीन उलथापालथ होऊ शकते असे संकेत दिसत आहेत.