MAHARASHTRA POLITICS : आमदार जयंत पाटील मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; जयंत पाटील यांनी स्पष्टचं सांगून टाकलं... - टॉप न्यूज मराठी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते हे सत्ताधारी बाकावर बसण्यासाठी इच्छुक असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. असं असतानाच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील Jayant Patil यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान यावेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे Sunil Tatkare आणि प्रफुल्ल पटेल Prafull Patel हे देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. मध्यरात्री उशिरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले असतानाच आमदार जयंत पाटील यांनी या भेटीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. 

जयंत पाटील या भेटीबाबत म्हणाले की, "मी सीएमची वेळ घेतली होती. वेळ थोडी पुढे गेली त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चहा घेतला. त्यानंतर सीएम आले त्यांनी विचारलं काय झालं. तेव्हा मी नगराध्यक्षांचा मुद्दा सांगितला. माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आलं. याबाबत मी त्यांना भेटायला गेलो होतो. यावर ते म्हणाले की मी माहिती घेतो. मी आधी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण ते दिल्लीला होते. त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो पाच-दहा मिनिटे भेटलो आणि बाहेर आलो. " असे आमदार जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान जेव्हा आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या भेटीसाठी निवासस्थानी पोहोचले होते. त्याचवेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. परंतु याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितल आहे.  

काही दिवसांपासून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते हे सत्ताधारी बाकावर बसण्यासाठी इच्छुक असून भाजपच्या नेत्यांची भेट घेत आहेत अशी माहिती सातत्याने समोर येत होती. परंतु जयंत पाटील यांनी काल उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी का घेतली?याबाबत सविस्तरच सांगून टाकले आहे.त्यामुळे त्यांच्या भेटीबाबत तरी चर्चेवर स्वल्पविराम लागला आहे.