मुंबई : स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अजित दादा पवार यांच्या मृत्यूला अजून फारसा काळ लोटला नाही. तरीही त्यांच्या पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येते आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पवार यांना नियुक्त करण्यात आले. दरम्यान आता पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी थेट वकिलामार्फत पक्ष नेतृत्वाला नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत पक्ष नेतृत्वाला नोटीस पाठवली असून यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत आणि निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामुळे पक्ष आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अजित दादा पवार उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत होते. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पवार या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पद आणि उपमुख्यमंत्री पदावर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. असं असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत आणि पदाच्या वैधतेबाबत सवाल उपस्थित केले जात असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.