Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या ढवळलेल्या राजकारणात शरद पवारांची नवी खेळी ? भाजपच्या बड्या नेत्यासोबत.... - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाल आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आणि एक आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या  शिवसेनेत स्थिरस्थावर होत नाहीत तोच आता शरद पवार देखील नवीन खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अंतर्गत धुसफुस आणि त्यात राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने भाजपच्या बड्या नेत्याशी केलेले बैठक महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन धुमाकूळ करणार का ? असे बोलले जाते आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातून अंतर्गत धुसफूस आकार घेऊ लागली आहे. शरद पवारांच्या काही सैन्याला सत्ताधारी बाकावर बसण्याची ओढ लागली आहे. तर अर्ध सैन्य अजूनही विरोधी पक्षातच ठाम आहे. दरम्यान अशातच शरद पवारांनी आपल्या आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेऊन त्यांचे विचार जाणून घेण्याची महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवली असल्याचे बोलले जाते आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याने घेतली भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट 

मुंबईमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन मोठा भूकंप होतो की काय या चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीमध्ये जर सत्तेत सामील झालोच तर नेमका काय वाटा मिळेल? याबाबत जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली असल्याच समजते आहे. 

एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप सुरू आहेत. येत्या काही दिवसात आणखीन एका नव्या राजकीय भूकंपाचा महाराष्ट्र साक्षी ठरणार का हे लवकरच स्पष्ट होईल.