Maharashtra Politics : नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला शिवसैनिकांकडून काळे झेंडे; नेमकं काय घडलं - टॉप न्यूज मराठी

नांदेड : आज नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या ताफ्याला उद्धव ठाकरेंच्या Udhhav Thackeray शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल आहे. 

नेमकं काय घडलं   

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Deputy CM Eknath Shinde यांच्या ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटून एकनाथ शिंदेंकडे आले. दरम्यान आता आमदार देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे जाणार असल्याचे बोलले जाते आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडून आता ऑपरेशन तुडवा सुरू करा असं शिवसैनिकांना सांगितलं गेलं. अर्थात फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत असते वेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन तुडवा सुरू करा असे आदेश दिले होते.  दरम्यान आज नांदेड जिल्ह्यातील सारखणी या गावाकडे जात असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार नागेश अष्टीकर हे देखील या ताफ्यामध्ये होते. दरम्यान खासदार नागेश अष्टीकर हे देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी अष्टीकर यांना विरोध दर्शविण्यासाठी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली आहे अशी माहिती मिळते आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला आहे. 

आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी यवतमाळ मधील उमरखेड येथे शिवसैनिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणे ,प्रत्येक घरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे, नवीन शिवसैनिकांची नोंदणी, बुथ स्तरावरील संघटन अधिक सक्षम करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याच्या हेतूने आज संवाद मेळाव्याच्या अंतर्गत शिवसैनिकांना संबोधित केले आहे.