मुंबई : शिवसेना शिंदे Shivsena गटाचे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीचे उमेदवार सचिन अहिर Sachin Ahi यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. Maharashtra Politics या निवडणुकी वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Sunetra Pawar या उपस्थित होत्या.
विधान परिषद उपसभापती निवडणुकीसाठी महायुतीकडून शिंदे गट शिवसेनेकडून सचिन आहिर आणि महाविकास आघाडी कडून ठाकरे गट शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्या विनंतीवरून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन आहीर यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन आहेर यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, " उपसभापतीपदी सचिन आहिर यांची एकमतान निवड झाली. विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो त्यांनी देखील सभागृहाचा मान राखून प्रस्ताव मागे घेतला. 1999 साली मी आणि सचिन आहेर सोबत निवडून आलो होतो. अहिर या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. मला त्यांच्याबाबत अनुभव आहे ते निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत." असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये थोडाफोडीच राजकारण सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटातून काढता पाय घेऊन सचिन आहिर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन आहेर यांची आज नियुक्ती होते आहे.